माय नगर वेब टीम
अहमदनगर - हिंदूराष्ट्र सेनेने आज शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठिंब्याबद्दल शिवसेनेने त्यांचे आभार मानले आहे.
नगर शहरातून शिवसेना महायुतीचे उमेदवार उपनेते अनिल राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, आरपीआय पाठोपाठ आता हिंदु राष्ट्र सेनेने सुद्धा राठोड यांना पाठिंबा दिला आहे. हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी यांनी आज शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्या बाबतचे पत्र दिले आहे.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवासेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडीच्या सुजाता कदम, यांच्यासह हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.


Post a Comment