माय नगर वेब टीम
अहमदनगर - शहरात केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारच्यावतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या परंतु लोकप्रतिनिधीच्या नियोजनाअभावी या योजना नगर शहरात राबविण्यात आल्या नाही, त्यामुळे नगर शहर हे विकासाबाबत मागे पडले आहे. सारसनगर सारख्या भागात आजही नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ का येते ? आज केंद्रात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे.आता राज्यातही भाजप-शिवसेनेची सत्ता येणार आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे. असे आवाहन महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांनी केले.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांनी सारसनगर भागातून प्रचारफेरी काढून मतदारांना अभिवादन केले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, सुनिल त्रिपाठी, दिपक खैरे, परेश लोखंडे, डॉ.श्रीकांत चेमटे, विशाल वालकर आदि उपस्थित होते.
यावेळी दिलीप सातपुते म्हणाले, शहराच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मनपात शिवसेनेची सत्ता असतांना शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागाचा विकास झाला आहे. परंतु सारसनगरच्या विकासाबाबत विरोधकांनी खोडा घालण्याचेच काम केल्यामुळे या भागाचा विकास झाला नाही, तेव्हा आता शिवसेना-भाजपचे उमेदवार अनिल राठोड यांना मोठ्या मताधिक्क्यांनी विजय करुन आपल्या भागाच्या विकासास चालना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
- ही प्रचारफेरी महात्मा फुले चौक, सारसनगर, भगवानबाबा चौक, शांतीनगर, गाडळकर मळा, कानडे मळा आदि भागातून काढण्यात आली.
Post a Comment