नगरमध्ये रंगला शास्त्रीय नृत्याचा कलाविष्कार
कथ्थक नृत्यरंग कार्यक्रम : गंधर्व डांस अकॅडमीचा उपक्रम : ७० नृत्यांगणांचे बहारदार शास्त्रीय नृत्य
माय नगर वेब टीम
अहमदनगर : येथील गन्धर्व डान्स अकॅडमी आयोजित" कथ्थक नृत्यरंग" या कार्यक्रमात बहारदार शास्त्रीय नृत्ये सादर करण्यात आली. यात अहमदनगर, शिरूर, शेवगाव येथील गन्धर्व डान्स अकॅडमीच्या ७o मुलींचा सहभाग होता. प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील नटेश्वर नृत्यकला मंदीरच्या संचालिका कथ्थक नृत्यालंकार सौ. शिल्पा भोमे तसेच अभिनेते शशिकांत नजाण, क्षितिज झावरे, पवन नाईक, बिभीषण सूर्यवंशी, प्रकाश शिंदे , प्रविण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. शिल्पा भोमे व त्यांच्या विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कथ्थक नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
तसेच गंधर्व डान्स अकॅडमी च्या विद्यार्थानीनी देखील कथकच्या सुंदर अशा रचना सादर केल्या. सादरीकरणासाठी सतीश काळे व सूरज शिंदे यांनी तबला संगत तर प्रणव देशपांडे यांनी हार्मोनियम ची साथ-संगत केली. सतिश काळे आणि बिभिशण सूर्यवंशी यांनी वादन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.अकादमीच्या मुख्य संचालिका श्रद्धा गांधी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
सौ भोमे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा जपताना नृत्यातील ताल आणि एकाग्रता शरीरात भिनत जाते ही निसर्गाची आराधना असून व्यक्तिमत्व विकसनासाठी तिचा श्रद्धापूर्वक उपयोग करावा. अभिनेते क्षितिज झावरे यांनी नृत्य व इतर कलांचा सुरेख संगम करून नगरचे सांस्कृतिक क्षेत्र अधिक समृद्धी करण्याच्या अकादमीच्या प्रयत्नांचे कौतुक केले, तर शशिकांत नजाण यांनी, पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांनावर न टाकता त्यांचा नैसर्गिक कल जपण्याचे आवाहन पालकांना केले.
गन्धर्व डान्स अकादमीच्या मुख्य संचालिका श्रद्धा गांधी व सहकारी विशाखा अरणकल्ले यांनी नृत्य दिग्दर्शन केले तर संयोजनासाठी त्यांना प्रशांत पाटोळे, प्रविण गायकवाड, प्रवीण नेटके, प्रमोद उदमले, मयूर गोडळकर, अविनाश मकासरे व विकास कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच प्रीती गांधी यांनी पूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यावेळी शिरूर नगर व शेवगाव येथील विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती होती.

Post a Comment