पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान गरजेचे - पोपटराव पवार
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शालेय जीवनापासून पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी आनंद बाजार सारखे उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारीक ज्ञान गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी सुद्धा समर्थ असला पाहिजे. शिक्षणाबरोबरच संस्कार देणे हे शिक्षणाचे उद्धिष्ट असले पाहिजे असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
हिवरे बाजार (ता. नगर) येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद बाजार उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. दिवाळीच्या सुट्टी च्या आगोदर प्रत्येक वर्षा आंनदी बाजाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्याथाथॉनी बाजारात त्यांच्याच शेतातील भाजीपाला , फळे, आणि फळभाज्या, रानभाज्या कडधान्य, गावरान अंडी, आकाशकंदील याबरोबरच निरनिराळे मनोरंजक खेळ व खास खवैय्यांसाठी पाणीपुरी, वडापाव, समोसा, ओली व सुकी भेळ, इडली सांबर, मटकी फ्राय, पावभाजी असे विविध पदार्थ सुद्धा विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तुकाराम थिटे, आभार विजय ठाणगे यांनी मानले .यावेळी गावातील महिला, तरुण तरुणी व परिसरातील बहुसंख्य पालक उपस्थित होते. पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांनी मतदान जागृती अभियानांतर्गत सर्वाना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच यावर्षी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक राजू शेख, भास्कर खोडदे, सुलभा दळवी, रुपाली पवार, सुवर्णा ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमााचे हरिभाऊ ठाणगे , एस.टी.पादीर, माजी केंद्रप्रमुख रो.ना.पादीर यांनी सर्व बालविक्रेत्यांचे कौतुक केले.

Post a Comment