कळमकर समर्थक म्हणतायेत आमचं ठरलं?



माय नगर वेब टीम
अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त आहेत. त्यातच त्यांच्या भगवा झेंडा असलेल्या पोस्ट  सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेेेत. त्यामुळे कळमकर हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानंतर कळमकर, जगताप यांच्यात चांगलेच राजकारण पेटले होते. मात्र त्यांच्यामध्ये समेट झाल्याचे दोन्ही गटाकडून सांगण्यात येत होते. दरम्यान आमच ठरलंय असा मजकूर आणि भगवा झेंडा असलेल्या पोस्ट व्हायरल झाल्याने कळमकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आपण लवकरच राजकीय भूमिका जाहीर करू, असे अभिषेक कळमकर यांनी माध्यमांना सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. दादा कळमकर हे खा. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुतणे अभिषेक हे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याने आता दादाभाऊ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारी (दि.9) पारनेर, नगर, श्रीरामपूर, संगमनेर येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रचार सभा आहेत. नगरच्या सभेत कळमकर शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post