माय नगर वेब टीम
मुंबई - राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहे. शिवसेना, भाजप, मनसे वंचित, काँग्रेस नंतर राष्ट्रवादीची ७७ जणांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहिर केली आहे.
राष्ट्रवादीची पहिल्या यादीत अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नवाब मलिक, यांच्यासह नगर जिल्ह्यातून कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, अहमदनगर शहर संग्राम जगताप, कोपगाव आशुतोष काळे, अकोले डॉ. किरण लहामटे, शेवगाव प्रताप ढाकणे, पारनेरमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.
अजित पवार यांना बारामतीमधून, धनंजय मुंडे यांना परळीमधून, रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमधून, छगन भुजबळ यांना येवलामधून, नवाब मलिक यांना अणुशक्ती नगर येथून (मुंबई उपनगर) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीमधून अजित पवार विरुद्ध गोपिचंद पडळकर, परळीतून धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा चुरशीचा सामना रंगताना दिसणार आहे.
Post a Comment