'साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखविला'


हभप महेश महाराज मडके । नालेगांव येथील श्री साईबाबा मंदिराच्या 17 वा वर्धापन दिन संपन्न

माय नगर वेब टीम

अहमदनगरर - भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्यासाठी तपश्‍चर्याची, त्यागाची आणि समर्पणानाची भावना आवश्यक आहे. संसार करतांना भैतिक सुखात आपले मन न गुंतवता भगवंतांचे नाम स्मरण केल्यास मन:शांती लाभते. आपल्या रोजच्या दिनचर्यात भगवंताचे नाम स्मरण महत्वाचे आहे. साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखविला आहे. त्या मार्गावर आपण चालले तर आपल्या जीवनाचे कल्याणच होणार यासाठी सत्मार्गाचा अवलंब करा, असे मौलिक विचार हभप महेश महाराज मडके यांनी मांडले.

नालेगांव येथील श्री साईबाबा मंदिराच्या 17 व्या वर्धापन दिन व साईबाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहातील काल्याची दहिहंडी हभप महेश महाराज मडके यांच्या हस्ते फोडण्यात आली. याप्रसंगी काल्याचे किर्तन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी संयोजक नगरसेवक गणेश कवडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, अनिल बोरुडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, संतोष गेनप्पा, मन्नूवीर आग्रवाल आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना हभप महेश महाराज म्हणाले, अध्यात्म आणि सामाजिक कार्यांची सागड घालण्याचे कार्य साईबाबांनी केले. त्यांनी आपले कार्य कोणाचीही जात, धर्म, पंथ हे न पाहता सुरु ठेवले, ते एक अवतारी पुरुष होते. समाजात चाललेल्या अनिष्ठ रुढी व परंपरांना छेद देऊन खरा धर्म मानवतावादाचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य केले. भक्ती रसामध्ये भेदभाव काहीच नसतो.

यावेळी संयोजक नगरसेवक गणेश कवडे यांनी सांगितले की, गेल्या 17 वर्षांपासून माजी नगराध्यक्ष सुरेश शेळके यांच्या प्रेरणेने श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्य केले जात असतात. यावर्षीही या तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात परिसारातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सप्ताहासाठी अनेकांचे हात लागत आहेत त्यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.

काल्याच्या किर्तनानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते महाप्रसादाच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. सप्ताह यशस्वीतेसाठी मन्नी पहिलवान शिंदे, अप्पा वाघमारे, रघुनाथ लांडे, बाळासाहेब वाघमारे, गुलाबराव कुचेकर, बाळासाहेब दळवी, शरद वाघ, दत्ता वामन, अभिजित वाघ, दिपक चत्तर, जयंत वाघ, कल्पना विकास जाधव आदिंसह कारंजा तरुण मंडळ, साई प्रतिष्ठान,वाघगल्ली परिसरातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post