राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी मार्कंडेयच्या खेळाडूची निवड
माय नगर वेब टीम
अहमदनगर - गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाची खेळाडू खुशी जाधव हीने पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन, राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली. पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत खुशी जाधव हीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 14 वर्षा खालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला.
खुशी जाधव हीची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, सचिव बाळकृष्ण सिद्दम, ज्येष्ठ विश्वस्त शरद क्यादर, अरविंद चन्ना, मुख्याध्यापक रावसाहेब क्षेत्रे आदींसह पर्यवेक्षक, शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी तीचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मार्कंडेय शाळेत सर्वसामान्य श्रमिक कामगारांची मुले शिक्षण घेऊन भवितव्य घडवित आहे. संस्थेच्या वतीने त्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे कार्य चालू आहे. जाधव या महिला खेळाडूने बॉक्सिंगमध्ये विद्यालयासह शहराचे नांव उंचावले असल्याची भावना मुख्याध्यापक रावसाहेब क्षेत्रे यांनी व्यक्त केली.

Post a Comment