सूडाच्या राजकारणाला नाकारले; जनतेच्या दरबारात मला क्लिनचिट
माय नगर वेब टीम
अहमदनगर - गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांमुळे माझ्यासाठी निवडणूक सोपी होती. विकासाचा बॅकलॉग भरून काढल्याने विकासाच्या मुद्यावर शहरात विधानसभा निवडणुक लढवून मोठ्या मताने विजयी झालो. विरोधकांनी दहशत, संरक्षणाच्या मुद्यावर निवडणूक लढवून काहीच उपयोग झाला नाही. शेवटी जनतेनेच मला आमदार करून जनतेच्या दरबारात क्लिनचीट दिली आहे. असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला.
विधानसभा निवडणुकीत नगर शहर मतदासंघातून आ. संग्राम जगताप दुसऱ्यांदा आमदार झाले. आज शनिवारी दुपारी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार अरूण जगताप, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक प्रकश भागानगरे आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले , पाच वर्षात आम्ही विकासकामे करून दाखविली. जनतेला आमच्यावर विश्वास होता म्हणूनच आम्हाला पुन्हा एकदा निवडूण दिले आहे. आता आमचे पहिले मिशन हे शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते, वीजेचे प्रश्न सोडविणे आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण हटवून त्यामध्ये मार्ग काढणार आहोत. शहर स्वच्छ व सुदंर बनविणार आहोत. अनेक वर्षांपासूनची विकासाची पोकळी भरून काढण्यासाठीच जनतेने
मला साथ दिली . राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.
यावेळी शहर - जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर - जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, बाबा गाडळकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरकरांचे त्यांनी आभार मानले.

Post a Comment