माय नगर वेब टीम
मुंबई-भाजप सोबत गेलेतर अडीच वर्षेआणि आमच्यासोबत आलेतर पाच वर्ष मुख्यमंत्री मिळेल.आता शिवसेनेने याबाबत विचारकरायचा असे सुचक उद्गार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत काढले. भाजप आणि शिवसेना दिवाळीनंतर सत्ता स्थापन करणार आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत ठरले नाही. वडेट्टीवारांनी केलेल्या या सूचक उद्गाराबाबत शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "शेतकरी, कामगार, बेरोजगार यांचा सरकारवर रोष होता हे या निवडणुकीत पाहायला मिळाले. महाराष्ट्राला खड्यात टाकण्याचे काम भाजप सरकारने केले. सत्ता ही लोकहितासाठी वापरावी, लोकांना संपविण्यासाठी वापरू नये हे लोकांनी दाखवून दिले आहे. भाजप सरकारमुळे महाराष्ट्र डबघाईला आला आहे. महाराष्ट्रातील जनतेने सत्तेची गुर्मी उतरवली आहे. भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार राहिला नाही. पुन्हा महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वात प्रगती करणार नाही हे जनतेला वाटत असल्याचे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
Post a Comment