नगर जल्लोषच्या वतीने विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप


माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर जल्लोष ट्रस्ट आणि परिवाराच्या वतीने सायकल बँक उपक्रमांतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू तीन विद्यार्थ्यांना नवीन सायकल देण्यात आल्या. शिक्षणाची तळमळ असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत व क्लासला वेळ वाचावा या उद्देशाने तीन विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. उपमहापौर मालन ढोणे, चित्रपट अभिनेत्री शबनम मोमीन, अभिनेते सचिनकुमार कोतकर, नगरसेविका सुप्रिया जाधव आदींच्या हस्ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सुनिल केकाण, धुणीभांडी करून शिक्षण घेणारी रेणुका गारदे व वडिलांचे छत्र हरपलेल्या साक्षी बोरा या तीन विद्यार्थ्यांना नवीन सायकल देण्यात आल्या. यावेळी डॉ. अमोल बागुल, मनोज येनगुंदुल, संजय पाटील, धनंजय जाधव, वंश चव्हाण, नगर जल्लोष ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा आदींसह तोफखाना परिसरातील नागरिक व जल्लोष ट्रस्टचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने केलेल्या प्लॅस्टिक बंदी व स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणी साठी सामुहिक शपथ घेतली.
यावेळी बोलताना उपमहापौर म्हणाल्या, नगर जल्लोष ट्रस्टचे युवक कायम उत्साहात सामाजिक उपक्रम राबवुन मदतीचा हात देत असतात. गरजवंतांना मदत करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नगर जल्लोष ट्रस्टच्या या सामाजिक कामात सर्व नागरिकांनी सहभागी होत त्यांना सहकार्य करावे. घरची परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना सायकली देऊन नगर जल्लोष ट्रस्टने महत्त्वपूर्ण मदत केली आहे. त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगर जल्लोष ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून नगर जल्लोष ट्रस्ट नगरमध्ये सामाजिक उपक्रम राबवण्या बरोबरच गरजवंतांना मदत करत आहे. शिक्षणाची तळमळ असणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना त्यांचा वेळ वाचावा या उद्देशाने सायकली देत आहोत. सुनील केकाण हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी दिल्लीगेट ते मार्केटयार्ड पायी चालत जातो, रेणुका गारदे ही विद्यार्थिनी लोकांकडे धुणीभांडी करत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे तर साक्षी बोरा या विद्यार्थिनीचे वडिलांचे निधन झाले असून घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. पण या सर्वांची शिक्षण घेण्याची तळमळ पाहून नगर जल्लोष त्यांना मदत केली आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद गोंधळे, संजय बोगा, गणेश साळी, नरेश कोडम, रत्नाकर श्रीपत, हर्षद आडेप, गौरव चीलका, आनंद दंडी, सचिन बोगा आदींनी परीश्रम घेतेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्‍वर श्रीराम यांनी केले आभार दीपक गुंडू यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post