'पौर्णिमे'च्या रात्री भाजपा नगरसेवकांचे खलबते ; म्हणतायत 'आमचं ठरलं'


माय नगर वेब टीम
अहमदनगर- शहराची आमदारकी मिळवण्यासाठी दोन्ही भैयाची काटेकी टक्कर नगरकराणा पाहवयास मिळत आहे. उपनगरात एका जेष्ठ नेत्यांच्या पुढाकरातून काही नगरसेवकांनी 'पौर्णिमे'च्या रात्री गुप्तगु करत वेगळा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल ठरलं...असं सांगत त्यानी जवळच्या कार्यकर्तेना' तसे निरोप दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमचं ठरले असे सांगणारे ते नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते कोणाला साथ देणार यांची खमंग चर्चा सुरू नगरात सुरू आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. युती आघाडीच्या बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवारांना आव्हान दिले आहे. अहमदनगर शहर मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची होत आहे. अनेक संघटना वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत आहेत. त्यातच आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्तेनी कोणत्याही परिस्थितीत गुलाल घ्यायचा अस निर्धार केला आहे. तसे डाव टाकण्यास ही त्यांनी सुरुवात केली आहे आहे. नगरात भाजपात बंडखोरी नसली तरी नगरची जागा भाजपने घ्यावी यासाठी माजी खासदार दिलीप गांधी व महापौर बाबासाहेब वाकळे प्रयत्नशील होते. शिवसेनेने उपनेते अनिल राठोड हे गेल्या वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ असल्यामुळे त्यांच्यासाठी ही जागा शिवसेनेने भाजपासाठी सोडली नाही. नगर शहर विधानसभा मतदार संघातही युतीचे संबध म्हणावे तसे चांगले नाही. त्यातच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून ठेवत शिवबंधन बांधले.याचा कितपत फटका आ.जगताप याना बसणार हे मात्र नक्की मात्र तो किती प्रमाणात मताच्या रूपाने बसनांर हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागले. नगरातील राष्ट्रवादी व शिवसेनेतील काही मोजक्या कार्यकर्त्यांमुळे दोन्ही बाजूची काही नेते मंडळी नाराज झाल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. दरम्यान निवडणुकीसह मध्यंतरीच्या काही घटनांमुळे नगरात शिवसेना आणि भाजप, राष्ट्रवादीतील नगरसेवक  मधील अंतर्गत धुसफूस आजही कायम आहे. एकीकडे या निवडणुकीत युती असताना दुसरीकडे भाजपचे महापौर व नगरसेवक महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारपासून अलिप्त आहे. मात्र त्यातील काही नगरसेवक व कार्यकर्ते आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची जोरदार आखणी करत असून मताचा जोगवा त्यांच्या नावाने मागत आहे. तसेच भाजपातील काही निष्ठावत नेते, नगरसेवक अनिल राठोड यांच्या प्रचाराची यंत्रणा हाकत आहे.
दरम्यान उपनगरात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एका जेष्ठ नेत्याच्या पुढाकराने घेतलेल्या बैठकित कोणच्या बाजूने ताकद उभी करायची याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post