... तर मी जीवन संपविन : धनंजय मुंडे
माय नगर वेब टीम
बीड: राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि माझी बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात मी हातवारे करीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच सिद्ध झाल्यास मी माझे जीवनच संपवून टाकीन, असे म्हणत आमच्या बहीण-भावाच्या नात्यात कुणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. आज पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडताना त्यांना अश्रु अनावर झाले.
मुंडे म्हणाले, राखी बांधणाऱ्या बहिणीबाबत मी कधीही खालच्या थराला जाणार नाही, मात्र नव्याने दाखल झालेले भाऊ मला खलनायक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून माझे समाजातील अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी महादेव जाणकार यांचे नाव न घेता केला. या प्रकरणाच्या खोलात जाऊन करता करविता शोधून जनतेपुढे आणल्यशिवाय गप्प बसणार नाही. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वि विडिओची सत्यता पडताळायला हवी होती. मात्र तसे केले नाही. मी याप्रकरणी दिलेली फिर्याद मात्र दाखल करून घेतली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी धनंजय मुंडे भावूक झाले. ते म्हणाले, मला बहिणी आहेत, तीन मुली आहेत. वाईट या गोष्टीचे वाटते की ज्या घरात बहुसंख्येने महिलांचा वावर आहे, अशा घरातील माझ्या सारखी व्यक्ती महिलेचा अपमान करू शकणार नाही असे म्हणत जनमानसात मला का संपवायचा प्रयत्न होत आहे, मी असं काय केलंय, असे सवालही त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

Post a Comment