... अन बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानला नगरकरांसोबत सेल्फी घेण्याचा झाला मोह


माय नगर वेब टीम
अहमदनगर – नवरात्री उत्सवानिमित्त नगर मधील देवाज ग्रुपचे अध्यक्ष मनपा सभागृहनेता स्वप्नील शिंदे यांच्या वतीने(गर्भा) दांडीया नाईट्स कार्यक्रमाचे आयोजन उपनगरातील बंधन लॉन्स येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात दांडिया खेळण्यासाठी शहरातील अनेक कुटुंबातील सदस्य आपल्या जोडीदारासोबत सहभागी झाले आणि दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.त्यात आणखी आनंदाची भर म्हणून बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान या दांडीया नाईट्स मध्ये सहभागी झाली होती. त्यांचे स्वागत देवाज ग्रुपचे अध्यक्ष मनपा सभागृहनेता स्वप्नील शिंदे यांनी केले. यावेळी सचिन शिंदे, सुमित कुलकर्णी, निलेश सत्रे, सचिन जगताप, राजेंद्र भांडवलकर, संदीप शिंदे, अमित गटणे उपस्थित होते. ज्या वेळी झरीन खान या कार्यक्रमात दाखल झाली त्यावेळी नगरकरांनी उत्साह वाढला आणि सर्व जन जोमाने दांडीया खेळत होते.

या कार्यक्रमात अभिनेत्री झरीन खान बोलतांना म्हणाल्या या नगरशहरात माझे चाहते येवड्या मोठ्या प्रमाणात आहेत ते मला आज या देवाज ग्रुपच्या कार्यक्रमात समजले. मला अशीही माहिती आहे कि हे देवाज ग्रुपचे अध्यक्ष गेल्या बारा वर्षानपासून नवरात्रीउत्सव मोठ्या भक्ती भावाने, आनंदाने साजरा करतात आज मला हि त्यांनी नगरकरांना भेटण्याची संधी या नवरात्रीउत्सवाचा निमित्ताने दिली. प्रचंड गर्दी पाहुन मला माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून नगरकरांनी माझ्यावर खूप प्रेम केल्याचे आज मला कळले. हे प्रेम पाहून माझाही नगरकरांन सोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर झाला. देवाज ग्रुप कायम धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, उपक्रमात आपला मोठा सहभाग कायम नोंदविण्याचे काम करतात असे मला मनापासून वाटते. असेच नागरिकांच्या हिताचे उपक्रम हे कायम राबवतील अशी मी भवानी माता चरणी प्रार्थना करते.

या प्रसंगी स्वप्नील शिंदे म्हणाले आपण नागरिकांच्या चेहऱ्यावर कायम आनंद कशा प्रकारे राखता ईल या उद्देशाने काम करत असतो या मध्ये माझ्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा असतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post