नवी दिली - राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्रासह आणखीन दोन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात.
राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 दिवसांचा अवधी लागतो. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी चार दिवसांपूर्वी राज्यातील सर्व प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला होता. त्यामुळे लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
Post a Comment