नगर शहर स्वच्छता व प्लॅस्टीकमुक्तीसाठी एक दिवस
माय नगर वेब टीम
अहमदनगर- स्वच्छ नगर समृद्ध नगर ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. सध्या आपल्यासमोर स्वच्छता व प्लास्टीकची मोठी समस्या आहे. या समस्येचे कायमचे निराकरण करायचे असेल तर फक्त शासनावर अवलंबून राहून चालणार नाही तर प्रत्येकाने शासनाच्या उपक्रमाबरोबर आपणही स्वच्छता व प्लॅस्टीकमुक्तीसाठी समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे आम्ही दर आठवड्यातून एक दिवस नगर शहरामध्ये सकाळी स्वच्छता व प्लॅस्टीक गोळा करण्याचे काम करतो व समाजामध्ये जनजागृती करतो अशी माहिती पंजाब अॅण्ड सिंध बँकेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक संतोष चौधरी यांनी केले.
स्वच्छ नगर समृद्ध नगर ग्रुपच्यावतीने स्वच्छता व प्लॅस्टीकमुक्तीसाठी एक दिवस शहरात स्वच्छता करतात. यावेळी संतोष चौधरी, नितीन राठोड, किशोर वेरुळकर, अभिजित भालेराव, पुनम नरनवारे, अभिजित राजपूत, बाळासाहेब उनवणे आदी नागरिक उपस्थित होते.
यावेळी संतोष चौधरी म्हणाले की, सामाजिक भावनेतून आम्ही सर्व तरुण-तरुणी पुढे येवून नगर शहर स्वच्छ नगर समृद्ध नगर करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही स्वच्छता, प्लॅस्टीकमुक्ती, महिला सबलीकरण, गोरगरीब जनतेला जेवणासाठी मदत करणे शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार. प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. बँकींग सेवा, घरापर्यंत घेऊन जावू, प्रबोधन करणे असे अनेक कामे आम्ही करणार आहोत. आजच्या युवा पिढीला एकत्र करुन सामाजिक उपक्रमाकडे वळवणे अत्यंत गरजेचे आहे. भारत देशामध्ये युवकांची संख्या खूप मोठी आहे. देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचा मोठा वाटा असेल, समाजामध्ये विविध विषयांवर जनजागृती व्हावी यासाठी युवकांनी पुढे यावे.असे आवाहन त्यांनी केले.
Post a Comment