आज शाळा बंद...? तर बुधवारपासून बेमुदत संप..


माय नगर वेब टीम
मुंबई: शिक्षक-शिक्षकेतर तसेच, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आज, सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्‍यता आहे. यानंतरही सरकारने शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक शिक्षक संघटनांनी दिली आहे. 

शिक्षकांच्या मागण्या मान्य होतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष असून मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेच्या तोंडावर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहेसंपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे. यामुळे राज्यभरातील शाळा बंद राहणार आहेत. मात्र या संपात फूट असल्याचेही समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीमार्फत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. परंतु, काही शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलन गणेशोत्सवानंतर करण्याची सूचना केली होती. तरीही समितीने ९ तारखेला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या मुद्यावरून संघटनांमध्ये फूट पडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शाळा बंद आंदोलन पूर्णपणे यशस्वी होण्याची शक्‍यता कमी असल्याचेही एका संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post