वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना ज्ञानदानात अडचणी


आ. अरुण जगताप यांचे प्रतिपादन; पवननगर येथे उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

माय नगर वेब टीम

अहमदनगर- बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत. पुर्वी शिक्षक शिक्षणाबरोबरच संस्काराचेही धडे विद्यार्थ्यांना देत होते. पण आता शिक्षकांना विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामांनाच जुंपले जात असल्यानेच त्यांचे मुळ काम असलेल्या ज्ञानदानाच्या कामातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे चित्र बदलण्याचे गरज आहे, असे प्रतिपादन आ. अरुण जगताप यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त भिस्तबाग चौक पवननगर येथील कामधेनू गोशाळेच्यावतीने शहरातील सर्व शिक्षकांना एकत्रित करुन त्यांचा सत्कार आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षक नेते संजय कळमकर, नगरसेविका शितल जगताप, मीनाताई चव्हाण, दीपाली बारस्कर, नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, प्रशांत भालेराव, हभप शामसुंदर नानेकर, तुळशीराम लबडे, अमोल बागूल, विठ्ठल तिवारी, आशा गावडे, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र कडलग, नितीन बारस्कर, संदीप खोसे, विजय नालकर, रंजना उकिर्डे, साधना बोरुडे, अंजली आव्हाड, शिल्पाताई दुसुंगे, ज्ञानदेव दारकुंडे, शंकर बारस्कर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय कळमकर म्हणाले, फेसबुक, व्हॉटस्‌अप ही माध्यमे समाजासमोरील जागतिक दु:खे आहेत. मोबाईल, टिव्हीमुळे शिक्षणाचा मोठा गोंधळ सुरू आहे. विद्यार्थ्यांवर कुटुंबियांबरोबरच शिक्षकांकडून संस्कार होत होते आता मोबाईलमुळे ते बंद झाले आहेत. कोणालाही दुसर्‍याशी बोलायला वेळ राहिलेला नाही. ही मोठी समस्या असून यापुढील काळात सुसंस्कृत पिढी घडविण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे.

शिवाजी चव्हाण म्हणाले, समाज घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांना बालवयातच आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो त्यामुळे समाजातील प्रत्येकानेच शिक्षकांचा सन्मान करणे गरजेचे आहे. याच भावनेतून हा कार्यक‘म आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक‘माचे सूत्रसंचलन विठ्ठल तिवारी यांनी केले तर नगरसेवक संपत बारस्कर यांनी आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post