शिवसेनेत इच्छुकांच्या मुलाखती


माय नगर वेब टीम
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार असे बोलले जात असले तरी, शिवसेनेची स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. शिवसेनेने आजपासून मुंबईत इच्छूक उमेदवारांच्या तोंडी मुलाखतींना सुरवात करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मतदारसंघातील इच्छूकांच्या मुलाखती यावेळी घेतल्या जाणार आहेत.

शिवसेनेतून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती आजपासून (ता. 10) मुंबईत शिवसेना भवनात होणार आहेत. या मुलाखतीला कोण कोण चेहरे असणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या मुलाखती 20 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.






दादर येथील शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. शिवसेना नेत्यांचे पॅनल या मुलाखती घेणार आहे. १८ सप्टेंबरला नगरसह नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावमधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्याबरोबरच नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पत्नी व माजी महापौर शीला शिंदे , माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनीही उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे. राठोड हे मुलाखतीला जाणारच आहेत, पण शिंदे, कदम यांच्याबरोबरीने आणखी कोण मुलाखत देणार याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post