ग्रामसेवकांचा संप ; गाव गाडा ठप्प



माय नगर वेब टीम

अहमदनगर- विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी २२ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. दरम्यान तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले. परिणामी अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे तेराशे अकरा गावांसह ब्राह्मणी, वांबोरी, उंबरे, चेडगाव, मोकळ ओहळ, कात्रड आदींसह परिसरातील अन्य गावातील विकास कामांना वीस दिवसांपासून ब्रेक मिळाला आहे.

ग्रामस्तरावरील सर्वच विकासकामे ही ग्रामपंचायत मार्फत होतात. याशिवाय वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात जमा होतो. याशिवाय विविध योजनांचे प्रस्ताव वेळेत दाखल होत नसल्याने बहुतांश लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या खात्यावर निधी पडून असतानाही केवळ संपामुळे कामांना खोडा बसत आहे. पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून सदर निधी अखर्चित राहण्याची भिती व्यक्त होत आहे. याचा फटका ग्रामविकासला बसणार आहे. त्यामुळे सरकारने ग्रामसेवकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.अन्यथा दुर्लक्ष केल्यास गावातील समस्या दिवसागणिक वाढल्यास नवल वाटायला नको...

दाखल्यासाठी हेलपाटे
ग्रामसेवकांच्या अनुउपस्थीत तातडीची कामे मार्गी लागावी. यासाठी पंचायत समिती स्तरावरून काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रभारी करण्यात आली. मात्र, संबधित कर्मचारी सदर गावात फिरकत नसल्याने दाखल्यावर स्वाक्षरीसाठी ग्रामस्थ, विद्यार्थी, रुग्ण, जेष्ठ नागरिकांवर दाखल्यासाठी हेलपाटे मारण्याची नामुष्की ओढविली आहे.



साथीच्या आजाराने त्रस्त

ग्रामसेवकांच्या कामबंदमुळे सर्व सामान्य जनतेला लागणाऱ्या सुविधा मिळणे दुरापास्त आहे. गावात साथीचे आजार वाढले,पाणी पुरवठा, स्वच्छता,जन्म मृत्यू नोंद, विविध दाखले या सुविधा बंद आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post