'तो' विषय महापालिका विशेष सभेच्या अजेंड्यावर घ्या


अन्यथा शुक्रवारी कर्तव्यदक्ष अधिकारी बचाव समितीचे धरणे आंदोलन

माय नगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांना पुर्वपदावर रुजू करुन कामाचा चार्ज त्यांच्याकडे सोपविण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी बचाव समिती प्रयत्नशील आहे. यासाठी महापालिकेच्या शुक्रवार दि.13 सप्टेंबरच्या विशेष सभेत अजेंडा दुरुस्त करून शहरातील जिव्हाळ्याचा आणि क्रीडा विषयक धोरणाचा विषय अजेंड्यावर घेऊन नागरिकांचे म्हणणे शासनास पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर मागणीचे निवेदन बुधवारी (दि.11 सप्टेंबर) मनपा आयुक्त, महापौर, नगर सचिव यांना देण्यात आले. यावेळी अधिकारी बचाव समितीचे भैरवनाथ वाकळे, हरजितसिंह वधवा, आसिफ दुल्हेखान, अभिजित वाघ, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, हरिभाऊ डोळसे, राजेंद्र पडोळे, तुषार सोनवणे, दिपक शिरसाठ, विकास गेरंगे, फारुक बागवान, राजेश सटाणकर, अरुण थिटे, सतीश निमसे, संजय खाडे, दत्ता जाधव, भैरवनाथ खंडागळे, शंकर जगधने, गणेश माने, लहू लोणकर आदींसह शहरातील विविध स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी व बचाव समितीचे सदस्य उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांना पुर्वपदावर रुजू करुन कामाचा चार्ज त्यांच्याकडे सोपविण्याची शहरातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. यासाठी मनपाचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे, मुदस्सर शेख, सोनालीताई चितळे, मीनाताई चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, रूपाली वारे, आसिफ सुलतान यांनी या संदर्भात विशेष सभेमध्ये नागरिकांचे म्हणणे ठराव घेऊन शासनास पाठविण्याचे पत्र मनपा प्रशासनाला दिले आहे. मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी बचाव समितीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. मनपाने काढलेला अजेंड्यात शहरातील सजग नागरिकांच्या भावना व नगरसेवकांच्या पत्राचा सन्मान ठेवून त्वरित दुरुस्ती करावा आणि 13 सप्टेंबरच्या सभेत हा विषय घेऊन शासनास सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post