'साकळाई'ची फसवाफसवी! ; शेतकऱ्यांच्या आक्रमकतेने खा. विखेंची कार्यक्रमाला दांडी!


माय नगर वेब टीम

अहमदनगर -

गेल्या 25-30 वर्षांपासून साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी यासाठी लढा सुरू आहे. शेतकरी जरी प्रामाणिकपणे एकजुट करत असले तरी राजकारण्यांनी मात्र मतांच्या भिकेसाठी साकळाई च्या नावाचा वापर केला. काहींचा उद्देश स्वच्छ होता तर काहींनी स्वच्छ करून घेतला. साकळाई साठी मी काय काय केले हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे पुढारी याच श्रीगोंदा नगर मतदारसंघात मतांचे राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या हे जग सोडुन गेल्या. पण साकळाई चा पाऊल पुढे जायला तयार नाही. यापूर्वी ही साकळाई चा सर्व्हे झाला आणि आताही साकळाई च्या सर्व्हे चा आदेश काढलाय. पण पुढे काय.... लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री वाळकी मध्ये येत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर साकळाई ला प्रशासकीय मंजुरी दिली जाईल असे स्पष्ट केले. पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 10-12 दिवसात कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, या स्थितीत गेल्या आठवड्यात साकळाईच्या सर्व्हेचा आदेश निघाला आहे. यापूर्वीच्या राजकारण्यांनीही दिलेले आश्वासन पाहता आता साकळाई योजनेतील लाभधारक शेतकरी आक्रमक होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान साकळाईची जबाबदारी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतलेली आहे, साकळाई योजना प्रगतीपथावर दिवू न लागल्याने खा. विखे पाटील यांच्या विरोधात तीव्र नाराजी वाढू लागली आहे. या तीव्र नाराजीमुळेच खा. विखे पाटलांनी नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील कार्यक्रमाला दांडी मारली असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


नगर तालुक्यातील रुईछत्तीशी (ता. नगर) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. यावेळी उपनेते अनिल राठोड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्याम शेलार, बाळासाहेब हराळ, अनिल कराळे, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, उपसभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, रवींद्र भापकर, सरपंच मीनाक्षी जगदाळे, दिपाली गोरे, शिवसेना तालुका प्रमुख राजू भगत, प्रकाश कुलट उपस्थित होते.

नगर- श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांना साकळाई उपसा सिंचन योजना वरदान ठरणारी आहे. ही योजना झाली तर हा भाग सुजलाम सुफलाम होईल, यासाठी लाभधारक शेतकरी वारंवार आवाज उठवत आहेत. प्रत्येक वेळी पेक्षा यावेळी साकळाई कृती समितीने शेतकऱयांची मोट बांधत, जनजागृती करत सरकारला जागे करण्याचे काम केले. साकळाई कृती समिती आणि शेतकऱ्यांच्या एकीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाळकी त येऊन साकलाईला प्रशासकिय मंजुरी विधानसभेच्या अगोदर देण्यात येईल अशी घोषणा करावी लागली. कृती समितीने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मंत्रालयात ना. गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठका घेतल्या. त्यामुळे साकळाई चा प्रश्न पुढे ढकलला. दरम्यान सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनीही उपोषण, आंदोलने, गावागावात जनजागृती करून रान पेटवले. साकळाई चा प्रश्न सोडविण्यासाठी काही ठराविकच मंडळी आग्रही आहे, परंतु योजनेचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष पुढे आहेत. येणाऱ्या विधानसभेत माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप यांनी साकळाई साठी काय केले याचा जाब विचारल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. परिणामी तीव्र असंतोशा ला सामोरे जावे लागणार आहे.

रविवारी जिल्हा परिषद सदस्या अनिता हराळ यांच्या विकास निधीतील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबत शेतकर्‍यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागणार होते. याची कुणकुण लागल्याने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी रुईछत्तीशीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मुख्यमंत्री साहेब काय झालं आपल्या आश्वासनांचे आशा पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. असे असतांना गत आठवड्यात साकळाई योजनेचा सर्व्हेचा आदेश काढला आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द चुनावी जुमला होता की काय? अशी भावना वाढीस लागली असून खा. विखे पाटील व भाजपावर शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. असे असले तरी साकळाई साठी खा. विखे पाटील हे एक आशेचा किरण असल्याचे शेतकरी खासगीत बोलतात. तर इतर पुढारी एकाच माळेचे मणी असल्याची टिपण्णी ही केली जात आहे. आठ-दहा दिवसांत समजेल च साकळाईला प्रशासकीय मंजुरी मिळतेय की नाही... अन्यथा लाभधारक शेतकऱयांनी समजून घ्यावे.... मागचे पाढे.....

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post