ग्रामीण भागातील डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा



डॉ.राजेंद्र धामणे

माय नगर वेब टीम

अहमदनगर - ज्या ठिकाणी कन्सल्टंट पोचू शकत नाही त्या ठिकाणी ग्रामीण भागातील डॉक्टर तळागाळापर्यत पोहचले आहेत. ग्रामीण भागातील डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे असे प्रतिपादन डॉ.राजेंद्र धामणे यांनी केले.

अहमदनगर येथील माऊली संकुल एक नरचरिंग द रूट या विषयावर एक दिवसाचे तज्ञ डॉक्टाराचे चर्चासत्र आयोजीत केले होते, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी डॉ.राजेंद्र धामणे, डॉ.सुजित धामणे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, कुमार जगताप, अनिल बेंद्रे, डॉ.चंदन गुफ्ता, डॉ.अर्चना जाधव, डॉ.मीरा बडवे, डॉ.बाळासाहेब देवकर, डॉ.मरीयम माजीद, डॉ.जयश्री रुराळे, डॉ.प्रविण कराळे, डॉ मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी धामणे म्हणाले कन्स्लटनंट व प्रॅक्टीसनर याच्यात जी दरी निर्माण झाली आहे, ती या वर्कशॉप च्या माध्यमातून दुर होणार आहे. नगर मध्ये चांगल्या विचाराचे कन्स्लटनंट आहे. डॉक्टरी व्यवसाय असला तरी ती एक सेवा आहे.

डॉ.बोरगे म्हणाले आपल्या देशाचा माता मुत्यू दर हा २०३० पर्यत ७० टक्के पर्यत आणायचा आहे. यासाठी प्रशासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसुतिचे प्रमाण वाढत चालले. डॉ.इंगळे यांनी पुढाकार घेऊन नरचारिंग द रुट या एक दिवसाच्या चर्चासत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात सराव करणाऱ्या डॉक्टरांना चांगलाच फायदा होणार आहे. या चर्चासत्रासाठी डॉ.हेमंत इंगळे, डॉ.अनंत इंगळे, डॉ.विकास दुसुंगे, डॉ. सागर पठारे, डॉ. मनोज इंगळे, गणेश भोसले, रणजीत घाडगे या प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.प्रदीप इंगळे सूत्रसंचालन डॉ.नेहा शिंदे व निकिता संचेती यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post