आ. जगतापांना शिवसैनिकांचा कडवा विरोध ; 'मातोश्री'वर धाडणार 'त्या' प्रकरणाचा अहवाल


माय नगर वेब टीम

अहमदनगर – आगामी विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली असून नगरचे मैदान तापू लागले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच यंदाही भैया-भैयांची हायहोलटेज लढत पहावयास मिळणार आहे. विद्यमान आमदार संग्राम जगताप हे धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र केडगाव येथे झालेल्या हत्याकांडात दोन शिवसैनिकांचे प्राण गेले. त्याला आमदार संग्राम जगताप हे जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांची आहे. त्यामुळे आ.जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये. असा आशय असलेला ठराव शिवालय येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.  हा ठराव मातोश्री वर दोन दिवसात धाडला जाणार असल्याचे शिवसेनेच्या नगरसेवकांमधून सांगितले जात आहे. दरम्यान भाजपाने नगरच्या जागेवर दावा सांगितल्याने तिसरा भिडू मैदानात उतरू शकतो. तर वंचित आघाडीचीही जोरदार तयारी सुरू आहे.


गणेशोत्सव सरताच विधानसभेची आचारसंहिता कधीही लागेल असे आजची राजकीय परिस्थिती आहे . याच स्थितीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असून नगर शिवसैनिकांनी त्याला कडाडून विरोध दर्शविला आहे. 'शिवायलया ' त झालेल्या या बैठकीतून आमदार जगताप यांच्यासोबतच शिवसेनेकडून इच्छुक असलेले संभाजी कदम अन शीलाताई अनिल शिंदे या दोघांचाही हिरमोड करण्यात राठोड यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे. आ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण गेले. त्याला आमदार जगताप हेच जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांची आहे. त्यामुळे त्यांना "शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा ठराव शिवालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. याशिवाय अनिल राठोड यांनाच उमेदवारी देण्याचा एकमुखी ठरावही त्यात आहे. या ठरावातून राठोड यांनी विरोधक आमदार जगताप यांच्यासोबतच पक्षांतर्गत स्पर्धक शीलाताई अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांचाही पत्ता कट करण्याची चाल खेळल्याची चर्चा आहे. या ठरावावर नगरसेवक व शिवसैनिकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. तो ' मातोश्री ' वर धाडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post