माय नगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहरासह उपनगरात सध्या डेंग्युच्या साथीने थैमान घातले असून शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर डेंग्युबाधित रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे मात्र चुकीची माहिती देऊन सर्वांचीच दिशाभुल करीत असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी मंगळवारी (दि.३) दुपारी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना घेराव घालत जाब विचारला.
शहरातील वैदुवाडी येथील रहिवाशी व महापालिकेचा कंत्राटी कामगार बाबाजी शिंदे याचा मागील आठवड्यात डेंग्युची लागण झाल्याने मृत्यू झाला होता त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.बोरगे यांनी मयत बाबाजी हा देवदर्शनाला गेला होता तिकडे त्याला ही लागण झाली असेल अशी माहिती प्रसारमाध्यमांसह प्रशासनालाही दिली होती. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून वैदुवाडी परिसरात किमान ५०-६० जण साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यातील सहा जणांना डेंग्युची लागण झालेली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे डॉ.बोरगे सर्वांचीच दिशाभुल करत असल्याचा आरोप करत वैवाडी येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.३) दुपारी महापालिकेत येवून आयुक्त भालसिंग यांना घेराव घालत जाब विचारला तसेच डेंग्युची लागण झाल्याचे अहवालच त्यांच्यासमोर मांडले. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, विनित पाऊलबुधे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, अजिंक्य बोरकर, तायगा शिंदे, जालिंदर शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी अनेक नागरिकांनी फक्त वैवाडीच नव्हे तर शहराच्या विविध भागात डेंग्युची साथ मोठ्या प्रमाणावर फैलावली असून अनेक रुग्ण डेंग्युने बाधित झालेले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती यावेळी आयुक्तांना दिली. साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महापालिकेचा आरोग्य विभाग हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप करीत डॉ.बोरगे यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली.

अहवाल येताच डॉ. बोरगेंवर कारवाई
आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्या विरोधात वैदवाडी येथील नागरिकांनी मागील आठवड्यातही मोर्चा काढला होता. त्यावेळी कोंडवाडा विभागातील हंगामी कर्मचाऱ्यांनी डॉ.बोरगे हे कर्मचाऱ्यांना आपल्या सोनेवाडी येथील शेतावर कामासाठी पाठवत असल्याचा आरोप केला होता. तसेच मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नेमलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांचे मानधनही रखडवले असून त्यासाठी पैसे घेऊनही मानधन दिले नसल्याचा गंभीर आरोप केला होता. या सर्व आरोपांची चौकशी सुरु असून उपायुक्त सुनिलं पवार यांच्याकडून याबाबत अहवाल प्राप्त होताच डॉ.बोरगे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी आयुक्त भालसिंग : यांनी दिले. तसेच मयत बाबाजी शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव महापौर कार्यालयाकडे तातडीने सादर केला जाईल, सर्व हंगामी कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला जाईल, त्यांची थकित बिले अदा केली जातील, तसेच मयत बाबाजी शिंदे यांच्या पत्नीस कंत्राटी कामगार म्हणून महापालिकेच्या सेवेत घेण्यात येईल असे आश्वासनेही आयुक्त भालसिंग यांनी दिली. याशिवाय शहरात साथीच्या आजारांचा उद्रेक रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत तसेच सतर्क राहण्याबाबत प्रशासनास आदेश देण्यात आले आहेत. शहरातील स्लम एरियात आपण स्वत: पाहणी करुन उपाययोजना होतात की नाही याची खात्री करु. साथीच्या आजारांना रोखण्यासाठी सर्वो तोपरी प्रयत्न करण्यात येतील, नागरिकांनीही यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त भालसिंग यांनी केले आहे.
Post a Comment