विद्यार्थ्यांची पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत
माय नगर वेब टीम
अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्याचे सहकार व शिक्षण महर्षी कै. शिवाजीराव नागवडे यांच्या ज्ञानदीप संस्थेतील श्री रामेश्वर विद्यालयाच्या (चिखली) वतीने सांगली, कोल्हापूर पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत पाठविण्यात आली.
काही दिवसांपुर्वी शालेय शिक्षकांनी सांगली, कोल्हापूर पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात शालेय साहित्याची मदत जमा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी 450 वह्या, 50 पाट्या, तेल खडूचे 25 बॉक्स, 25 पाऊच, 25 अक्षरी पाट्या, 25 चित्रावली, 120 स्कॉयर वह्या, 25 स्कूल बॅग व 10 पेन्सिल बॉक्स, शंभर पेन, महिलांसाठी 75 साड्या व पालकांसाठी 11 पोशाख जमा केले. तर सामाजिक जाणिवेतून चिमुकल्यांनी खाऊच्या पैश्यासह 15 हजार रुपयाची आर्थिक मदतनिधी जमा केला. या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापक, शालेय शिक्षक नंदकुमार शितोळे, साखरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. ही मदत बाळासाहेब भोर, उध्दव गायकवाड, नंदकुमार शितोळे, सुहास शिंदे यांनी प्रत्यक्ष पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोहच केली.
Post a Comment