'त्या' जलमय शाळेची तहसीलदारांनी केली पाहणी



माय नगर वेब टीम

अहमदनगर- पावसाळ्याच्या दिवसात राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीत वने-घेरुमाळ वस्ती जिल्हा परिषद शाळेसमोर साचणाऱ्या पाण्याबाबत राहुरीचे तहसिलदार फसोयोद्दीन शेख यांनी दखल घेत मंगळवारी सकाळीच शाळेच्या परिसराची पाहणी केली. दरम्यान उपस्थित रहिवाशी शेतकरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

नेवासा-राहुरी या सिमेवरील पूर्वी अरुंद असलेला ओढा रुंद झाल्याने व रस्त्याच्या बाजूस असलेले गटार बुजविल्याने पाणी शाळेकडे येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अंगणवाडी सेविका व शिक्षकांनी आपल्या अडचणींचा पाढा तहसीलदाररांसमोर मांडला. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करून पाण्याचा मूळ प्रवाह सुरू करून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे महसूल मंडळ अधिकारी सी.ए देशमुख व कामगार तलाठी संजय ढोके यांना तहसीलदार यांनी सूचित केले. दरम्यान दुपारी पंचायत समितीचे शाखा अभियंता पाटील यांनी शाळेची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल दिला. याप्रसंगी सरपंच प्रकाश बानकर, ग्रा.प सदस्य पोपटराव बानकर, विजय बानकर, शिक्षक मल्हारी शिरसाठ, मनिषा आहेर, अंगणवाडी सेविका ताराबाई अससुरे आदी. उपस्थित होते...

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post