माय नगर वेब टीम
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. अशातच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना राहाता मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकार्यांनी बैठक घेत एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे. याबाबतचे पत्रही महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक रामदास आंबटकर यांना पत्र दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपात इनकमिंग जोरात असून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात तब्बल 10 त 12 जण इच्छूक आहेत. तर संगमनेर मतदारसंघात सर्वाधिक 24 जण इच्छूक आहेत. अहमदनगर जिल्ह्यात भाजपाला वातावरण चांगले आहे. मुलाखतीला ऊस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना राहाता विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी. हे शिर्डी विधानसभा भाजपाच्या वतीने सर्वानुमते ठरले असून त्यांना राहाता तालुका भाजपाच्यावतीने एक लाखापेक्षा अधिक मताने निवडून विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा सरचिटणीस नितीनराव कापसे पाटील सुचक असून तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजुरकर अनुमोदक आहेत. निवेदनावर संजय सोमवंशी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांच्या सह्या आहेत.
Post a Comment