माय नगर वेब टीम
अहमदनगर - निमगाव वाघा (ता. नगर) येथे अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या मान्यतेने ऑलम्पिक पदक विजेते कै.खाशाबा जाधव 5 वी युवा (ज्युनिअर) फ्री स्टाईल व ग्रिको रोमण राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवडचाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील 126 मल्ल सहभागी झाले होते. उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने कुस्त्यांच्या डावपेचांचा थरार यावेळी रंगला होता. कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळी गावातील मिलन मंगल कार्यालयात जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करुन, मल्लांची कुस्ती लाऊन स्पर्धेला प्रारंभ झाले. यावेळी नगरसेवक संभाजी लोंढे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, कार्याध्यक्ष रामभाऊ लोंढे, खजिनदार पै.नाना डोंगरे, पै.नामदेव लंगोटे, पै.विलास चव्हाण, सुनिल भिंगारे, मा.सरपंच साहेबराव बोडखे, वसंत पवार, बाळू भापकर, गोरख खंडागळे, पै.कादर शेख, चंद्रकांत पवार, भानुदास ठोकळ, युवराज गांगवे, राहुल रणमळे, दिलावर शेख, ज्ञानेश्वर भगत, पोपट शिंदे, मयुर काळे, हर्षवर्धन कोतकर, बंडू शेळके, मयुर जपे, दशरथ गव्हाणे, अक्षय भांबरे, आदींसह जिल्ह्यातील नामवंत मल्ल, प्रशिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी खेळामध्ये अनेक संधी निर्माण झाल्याअसून युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे. कुस्ती खेळाला चांगले दिवस आले असून, मल्लांना मान, सन्मान देखील मिळत आहे. खेळाची आवड असल्यास पालकांनी आपल्या पाल्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत रामभाऊ लोंढे यांनी केले.
माधवराव लामखडे म्हणाले की, मैदानी खेळापेक्षा आजचे युवक मोबाईलच्या खेळात अधिक रमत आहे. याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, युवकांनी सदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजे. मॅटवरील कुस्ती प्रकार ग्रामीण भागात रुळत आहे. कुस्तीमध्ये एका दिवसात कोणी पहिलवान होत नसून, नियमीत सराव व व्यायामाच्या कष्टाने पैलवान घडत असतात. अनेक दिग्गज मल्लांचा वारस नगर जिल्ह्याला लाभला असून, नवोदीत मल्लांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन कुस्तीत नांवलौकिक करण्याचे त्यांनी आवाहन केले.
दिवसभर चाललेल्या कुस्त्यांच्या दंगलीने गावाला यात्रेचे स्वरुप आले होते. फ्री स्टाईल व ग्रिकोरोमन प्रकारात विविध वजनगटात मल्लांच्या कुस्त्या झाल्या. युवा मल्लांच्या अनेक उत्कृष्ट कुस्त्यांचे रोमांचक क्षण प्रेक्षकांना अनुभवयास मिळाले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून पै. हंगेश्वर धायगुडे, गणेश जाधव, प्रियंका डोंगरे, ईश्वर तोरडमल, गौरव पाटील यांनी काम पाहिले. या निवड चाचणीतील विजयी मल्लांची दि.13 ते 15 सप्टेंबर दरम्यान वारकरी शिक्षण संस्था, चाकण रोड, आळंदी देवाची (ता. खेड, जि.पुणे) येथे होणार्या ऑलम्पिक पदक विजेते कै.खाशाबा जाधव 5 वी युवा (ज्युनिअर) फ्री स्टाईल व ग्रिको रोमण राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा संघासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै.संदिप डोंगरे, विकास निकम, सोमनाथ आतकर, अलफिया शेख, महेश शेळके, प्रतिभा डोंगरे आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment