“मावळा छत्रपतींच मन वळवू शकत नाही”


माय नगर वेब टीम
सातारा: “मावळा छत्रपतींच मन वळवू शकत नाही” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे निवनिर्वाचीत खासदार आमोल कोल्हे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. राजेंच ठरलंय असं त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.


आमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. कोल्हे यांनी उदयनराजेंसोबत बंद दरवाजाआड चर्चा केली. त्यामुळे अमोल कोल्हे उदयनराजेंच्या मनधरणीसाठी आले असल्याची चर्चा रंगली होती.

निवडणूकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हादरे बसू लागले आहेत. पक्षातील बडे नेते राष्ट्रवादी रामराम करीत सत्ताधारी भाजपा तसेच शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने हादरलेल्या राष्ट्रवादीला आणखी धक्का बसणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, कॉंग्रेसचे जयकुमार गोरे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचाही भाजप प्रवेश निश्‍चित समजला जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post