माय नगर वेब टीम
अहमदनगर - तालुका स्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धेत माध्यमिक विदयालय निंबळक, नवभारत विदयालय देहरे संघ विजयी झाला. या संघाची जिल्हा पातळीवर निवड झाली.
सनफार्मा विदयालय एमआयडीसी व माध्यमिक विद्यालय निंबळक येथे जिल्हाक्रिडा कार्यालय व नगर तालुका क्रिडा समिती यांच्या वतीने चौदा, सतरा, एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींचे खो-खो सामने आयोजीत केले. या सामन्याचे उद्धाटन मुख्याध्यापक भानुदास कोतकर हस्ते करण्यात आले. या स्पर्धत चौदा वर्ष वयोगटातील अंतिम सामना माध्यमिक विदयालय इसळक निंबळक व वांळुज विदयालय यांच्यात झाला. हा सामना निंबळक संघानी एक डाव सहा गुणानी विजयी झाला. कीर्ती ओमने, मानसी चव्हाण, गायत्री केसरे, भाग्यश्री मुठे, प्रतीक्षा शिणारे, आरती पगारे या मुलीनी धावपट्टी सांभाळून ठेवली.
या सामन्यात सतरा वर्ष वयोगटातील अंतिम सामना माध्यमिक विदयालय इसळ क निंबळक विरूध्द कापुरवाडी विद्यालय याच्यात झाला. हा सामना निंबळक संघानी सात गुणानी जिंकला. प्रिया जवरे
श्रध्दा मुसळे, रजनी मिश्रा, अमृता रोकडे यांनी संघाची मजबुत स्थिती ठेवली. एकोणावीस वर्ष वयोगटातील अंतिम सामना नव भारत विद्यालय देहरे विरूध्द रूईछत्तीशी विद्यालय यांच्यात झाला. हा सामना देहरे संघानी सहा गुंणानी जिंकला.
यावेळी नगर तालुका क्रिडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, प्रताप बांडे, दत्ता नारळे, शिरिष टेकाडे, मारूती कोतकर, भानुदास कोतकर, बाळासाहेब बोडखे, अशोक कळसे, अर्जुन खेकडे, शंकर बारस्कर, सतीष बनसोडे, अशोक गुंड, अनिल शिंदे, उपस्थित होते.
Post a Comment