लोकांचे प्रपंच मोडणाऱ्या पाचपुतेंच्या हस्तक्षेपामुळेच शेतकरी पाण्यापासून वंचित- आ. राहुल जगताप


माय नगर वेब टीम
श्रीगोंदा - कुकडी सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे, कुकडी कारखाना बाजारभावाबाबत नेहमीच स्पर्धा करतो अडचणी असतानाही शेतकऱयांना एफआरपी पेक्षा ५००रुपये जास्त बाजारभाव दिला असून कुकडीच्या सभासद, शेतकरी, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे कुकडी कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल जगताप यांनी आज सांगितले. दरम्यान पाचपुते यांचा आ. जगताप यांनी चांगलाच समाचार घेतला. पाचपुते हे कुकडीच्या पाण्यात करत असलेल्या हस्तक्षेपामुळेच शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा ही गंभीर आरोप आमदार जगताप यांनी केला. ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले लोकांचे प्रपंच मोडले असे सयाजीराव उर्फ पाचपुते हे कुकडी कारखान्या बद्दल टीका करतात की राहुल जगताप यांनी अजित पवारांकडून कारखान्यासाठी 15 कोटी रुपये घेतले होते ते परत केले नाही म्हणून पवारांनी कुकडी कारखान्याची सगळी साखर भरून नेली असा खोटा प्रचार करणं पाचपुते यांनी थांबवावा. तसेच दिनू काका पंदरकर आपण मध्यस्थी करून पाचपुते यांना कारखान्यावर आणा आणि खरं-खोटं करा जर मी खोट बोलत असेल तर मी पाचपुते यांचा प्रचार करेल असा चिमटा जगताप यांनी काढला.

कुकडी सहकारी साखर कारखान्याची २२वी अधीमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार राहुल जगताप बोलत होते यावेळी बोलताना जगताप यांनी पाचपुते यांच्यावर टीका करत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला मंत्री असताना आपल्याला फक्त सह्यांचे अधिकार होते असे सांगणारे पाचपुते यांनी तालुक्याच्या विकासकामांच्या कागदावर सह्या न करता फक्त वैयक्तिक संपत्ती कमवण्यासाठी सह्याचा वापर केला अशी टीका करत सह्यांचे अधिकार असणारे सयाजीराव असाही पाचपुते यांचा उल्लेख केला. बबनराव पाचपुते कोणत्याही चिन्हावर लढले तरी जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असे सांगून बबनराव पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नसल्यामुळे पाचपुते हे श्रद्धांजली शुभेच्छा देतानाही कार्यक्रम कोणता आहे याचे भान न ठेवता डिंभे बोगदा आपण मंजूर केला असे सांगत फिरत आहेत. परंतु यासंदर्भात झालेल्या मीटिंगमध्ये पाचपुते यांचे रजिस्टर ला नाव जरी सापडले तरी मी पाचपुते यांचे काम करीन असे राहुल जगताप यांनी सांगितले.




पस्तीस वर्षात पाचपुतेंनी तालुक्यात पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. पाचपुते यांच्या 35 वर्षातल्या कामापेक्षा आपण पाच वर्षात तालुक्यासाठी मोठी विकास कामे केली. पाचपुते यांनी मात्र पस्तीस वर्षाच्या सत्तेचा उपयोग फक्त स्वतःची मालमत्ता वाढवण्यासाठी केली असून 50 कोटींचे हवेली 500 कोटींचे कारखाने शिरूरमध्ये मालमत्ता हे त्याचंच फळ असल्याची टीका पाचपुते यांच्यावर केली. आपणही तात्यांचा बच्चा असून कोणालाही घाबरत नसल्याचे जगताप यांनी सांगितले. विधानसभेला आम्ही सर्व एक आहोत आमच्यातून एकच उमेदवार निवडणूक लढवेल असेही आमदार जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले विखे समर्थक दत्तात्रय पानसरे यांना कोपरखळी मारत दत्ताभाऊ तुम्ही मोकळेपणाने हसा असे जगताप म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला तसेच शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास उशीर झाला कारण शासनाने एफ आर पी पेक्षा जास्त बाजारभाव दिल्यास त्यावर 30 टक्के कर भरण्यास सांगितला आहे. एफआरपीपेक्षा जास्त बाजार भाव दिल्यामुळे सरकारकडून कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंदरकर यांच्या टीकेचा समाचार घेत काका गावातले प्रश्न आपण पारावर बसून सोडवू तो विषय इथं काढणं महत्वाचे नाही, टाळी एका हाताने वाजत नाही ग्रामपंचायतीचे राजकारण इथे आणू नये असे सांगितले. राहिलेल्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात एफ आर पी ची रक्कम जमा केली जाईल असे आ. राहुल जगताप यांनी सांगितले. सभासदांंनी, शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून त्यावर कार्यवाही करू असे आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.




यावेळी बोलताना मा जि प सदस्य दिनकर पंधरकर यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नावरून तालुक्यातील सर्वच नेत्यांवर टीकास्त्र सोडत तुम्ही नेतृत्व करता मग पाण्याचे नियोजन का करत नाही. राजकारण करून नुसते तुम्ही कारखाने काढता सगळे नेते एकाच माळेचे मणी असल्याचे सांगत पाणीप्रश्नावरून पंधरकर यांनी सर्व नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. कारखान्याच्या अहवालातील त्रुटींवर टीका करत उत्पादन खर्च, कामगारांचा पगार यावरील खर्च हे श्रीगोंदा कारखान्यापेक्षा जास्त का असा सवाल उपस्थित केला. कार्यक्षेत्रे सोडून कुकडी कारखाना बाहेरून ऊस का आणतो असा सवाल यावेळी उपस्थित केला. कारखाना काही लोकांना मोठ्या प्रमाणात ऍडव्हान्स देत असून त्याचा व्याजाचा बोजा कारखान्यावर पडत असल्याचेही पंधरकर यांनी सांगितले.




यावेळी बोलताना बाबासाहेब भोस यांनी कुकडीच्या पाण्यात होणारा राजकीय हस्तक्षेप थांबवून कुकडीचे पाण्याचे नियोजन अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे तसेच सीना धरणात पाणी सोडावे अशी सुचना केली.




यावेळी बोलताना उक्कडगाव येथील गणेश कातोरे यांनी संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी कुकडी कारखान्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचा समाचार घेत भोस यांनी आधी ऊस पिकवून कारखान्याला घालावा मग कारखान्याच्या विरोधात बोलावे त्यांचे कारखान्यासाठी योगदान काय असा सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना सभासदांनी आमदार राहुल जगताप व संचालक मंडळाने एफ आर पी पेक्षा जास्त बाजार भाव दिल्याबद्दल अभिनंदन केले. कुकडीच्या पाण्याचे समान नियोजन करावं पाणीप्रश्नावर तालुक्यातील तिन्ही दादांनी एकत्र यावे अशी सूचना केली. यावेळी मेजर शंकर धारकर, दादासाहेब निर्फळ, भास्कर कदम, जी एस गावडे गुरुजी, गणेश बेरड, दिलीपराव गायकवाड, बाळासाहेब शेलार, बाबासाहेब सरोदे, तानाजी बोरुडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी ऍड सुभाष डांगे, नगरसेवक मनोहर पोटे, सतीश मखरे, राजाभाऊ लोखंडे, प्रशांत गोरे, संतोष कोथंबिरे, गणेश भोस, संजय आनंदकर दत्तात्रय पानसरे, संभाजी देविकर, एम.डी. शिंदे, सुरेश लोखंडे, अनिल वीर, हरिदास शिर्के, दत्तात्रय पानसरे यांच्यासह संचालक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संचालक विश्वासराव थोरात यांनी केले. कार्यकारी संचालक डी एम मरकड यांनी सभे पुढील विषयाचे वाचन केले सूत्रसंचालन नारायण शिंदे यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post