जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी वकील बदलण्याची कारवाई संशयास्पद-अण्णा हजारे



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन केली नाराजी व्यक्त

माय नगर वेब टीम

पारनेर-

जळगाव घरकुल घोटाळ्यातील वकील बदलन्याची कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे

याबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की जळगाव येथिल घरकूल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 46 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सुरूवातीपासून विशेष सरकारी वकिल म्हणून अ‍ॅड. प्रदिप चव्हाण यांनी अभ्यासपूर्वक व भक्कमपणे सरकारची बाजू मांडल्यामुळे आरोपींना शिक्षा होऊ शकली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एवढी कठोर शिक्षा अपवादानेच झालेली पहावयास मिळते. तथापि, शिक्षा झालेल्या दोषींपैकी काही जणांनी मे. उच्च न्यायालयात अपील दाखल केले असल्याचे समजते. सदर कामी या खटल्यासाठी उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकिल म्हणून सरकारची बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. अमोल सावंत यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश झालेले आहेत, हे योग्य वाटत नाही.




जळगाव घरकूल घोटाळ्यातील 48 आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा फर्मावल्यानंतर राज्य सरकारने सदर खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलले आहेत. या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2003 मध्ये आंदोलन केले होते. सदर खटल्यात सुरुवातीपासून वकील प्रदिप चव्हाण यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक काम पाहिलेले आहे. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवले आहे. असे असताना चव्हाण यांना पुढील कामकाजात विशेष सरकारी वकील म्हणून ठेवण्याऐवजी याच खटल्यातील काही आरोपींशी पूर्वीचे संबंध असलेले वकील अमोल सावंत यांची मुख्य विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांना सावंत यांचे सहाय्यक म्हणून नियुक्त केले आहे. सदर निर्णय अयोग्य आहे व संशयास्पद असल्याचे या पत्रकात म्हटले आहे




ही बाब समजताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे रुग्णालयात उपचार घेत होते. तरीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ फोन करून या प्रकरणात वकील बदलण्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी असे काही होणार नाही असे आश्वासनही दिले होते. तरीही शासनाकडून सावंत यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश निघाले. त्यावर रविवारी अण्णांनी मुख्यमंत्र्यांना सावंत यांची नियुक्ती न करता प्रदिप चव्हाण यांच्याकडेच या खटल्याचे कामकाज ठेवावे अशी परखड मागणी केली. त्यानंतर सरकारकडून योग्य निर्णय होईल अशी वाट पाहिली. परंतु अद्याप शासनाने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे नाराजी व्यक्त करनारे पत्र लिहिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post