भिंगारमध्ये बाप्पांचे विसर्जन



भिंगार येथील मानाच्या गणपतीची पोलिस अधीक्षकांच्या हस्ते उत्थापन पूजा

माय नगर वेब टीम
अहमदनगर - भिंगार येथील उत्थापन पूजा जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते झाली. सिंधू यांनी मानाच्या गणपतीची पालखी खांद्यावर घेतली असता बाप्पाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर भिंगार विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी शेवगावचे पोलीस उपाधिक्षक मंदार जावळे उपस्थित होते.
ब्राह्मणगल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीचे प्रमुख समीर देशमुख, अश्‍विन देशमुख, कार्तिक देशमुख यासह राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, काँग्रेसचे आर.आर.पिल्ले, शाम वाघस्कर, भाजपच्या नगरसेविका शुभांगी साठे, शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे, कलगीतुरा मंडळाचे सुनिल कर्डिले आदींसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
काही वर्षांपूर्वी प्रकाश लुणिया यांनी अर्पण केलेल्या पालखीतून मानाच्या देशमुख गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी शब्बीर सय्यद यांनी फुलांनी सजवली होती. तर सनई चौघडा वादन गयाजभाई शेख यांनी केले. रुद्रनाद ढोलपथकाने मानाच्या गणरायाला पहिली सलामी दिली. यानंतर इतर गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकित सहभागी झाले होते. एकुण 15 मंडळे सहभागी होतील असे कॅम्प पोलिसांनी सांगितले. मोहरमच्या पार्श्‍वभुमीवर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीत चौकातचौका मानाच्या गणरायाचे पूजन करण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post