प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी सुरु !





माय नगर वेब टीम
अहमदनगर -   महाराष्ट्रात वाताहात झालेल्या काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यपदी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक महिन्याभरापूर्वी काँग्रेसने केली. पण प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी त्यांचे कट्टर विरोधक विखे पिता पुत्रांनी केली आहे.
गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थित सोमवारी बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात म्हणजेच संगमनेर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच सेना-भाजप युतीच्या जनसंपर्क आणि माहिती सुविधा केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
राधाकृष्ण विखे संगमनेरमधल्या सेना भाजप पदाधिकाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक घेणार आहेत. तसेच 18 तारखेला मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश’ यात्रा याच तालुक्यातून जाणार आहे. यामुळे विखेंच्या संगमनेर दौऱ्याला विशेष महत्व आहे.
दरम्यान, थोरातांना राज्यातील काँग्रेस तर कोणत्याही परिस्थितीत सावरायचीच आहे पण आपला गडदेखील सुरक्षित ठेवायचा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post