पारनेर तालुक्यात वडनेर हवेली प्रथम तर कळमकरवाडी द्वितीय तर कर्जुलेहर्या गाव तिसरे
माय नगर वेब टीम
अहमदनगर- पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप २०१९स्पर्धेत यावर्षी राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी गाव प्रथम क्रमांकाने विजयी झाले. पारनेर तालुक्यातील पिंप्रीजलसेन गावाने राज्यस्तरीय दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर तालुकास्तरीय स्पर्धेत वडनेर हवेली प्रथम, कळमकरवाडी द्वितीय तर कर्जुलेहर्या गावाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याची बातमी पारनेर तालुक्यात समजताच सर्वत्र आनंदोत्सव करण्यात आला. तर पिंप्रीजलसेन ग्रामस्थांनी या निकालाचे जोरदार स्वागत केले आहे.
राज्यातील सुमारे ४५०० हजार गावे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले होते. त्याचा निकाल आज(रविवारी )पुणे येथे बालेवाडी स्टेडियम येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे संस्थापक अभिनेते अमीर खान, किरण राव, मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित भाटकर, आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, संगितकारअजय गोगावले, अतुल गोगावले, दिग्ददर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी गाव प्रथम क्रमांकाने विजयी झाले, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन गाव व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिंदी खुर्द गाव राज्यात द्वितीय क्रमांकाने विजयी झाले तर बीड जिल्ह्यातील देवऱ्याची वाडी, जळगाव जिल्ह्यातील अनोरे आणि वाशीम जिल्ह्यातील बोरवा बुद्रुक गाव राज्यात तृतीय क्रमांकाने विजयी झाले आहे. त्याचे बक्षीस वितरण रविवारी पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
यामध्ये राज्यस्तरीय १५ गावे निवड झाली होती त्यामध्येपारनेर तालुक्यातुन पिंपरी जलसेन व वडनेर हावेली ही दोन गावे होती.मात्र पिंप्रिजलसेन गावाने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे पारितोषिक मिळाले असून गावाने त्याबद्दल २२ हजार घनमीटर श्रमदान, १लाख ५९ हजार घनमीटर यंत्राचे काम, ६७ हजार घनमीटर एरिया ट्रीटमेंट, रोपवाटिका ९५०, माती परीक्षण ७६६, आगपेटीमुक्त शिवार ६६०, जलबचत ३९०, शोषखड्डे, परसबाग ३६६ आदी पाणीबचतीचे कामे स्पर्धेच्या टार्गेट पेक्षा जास्त टक्के झालेले आहेत.
जिल्ह्यातून राज्यस्तरीय निवड पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन गावाची झाली तर तालुकास्तरीय स्पर्धेत वडनेर हवेली प्रथम, कळमकरवाडी द्वितीय तर कर्जुलेहर्या गावाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष अँड, उदय शेळके, सौ. गिताजंलीताई शेळके यांच्यासह पिंप्रिजलसेन ग्रामस्थ या बक्षिस वितरण प्रसंगी उपस्थित होते. राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याचे जाहीर होताच पिंप्रीजलसेन ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
मेहनतीचे चीज झाले- सौ. गितांजली ताई शेळके
पारनेर तालुक्यातील दुष्काळी असणार्या पिंप्रीजलसेन गाव पाणीदार व्हावे हे महानगर बँकेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबराव शेळके यांचे स्वप्न होते. गुलाबराव शेळकेंचे स्वप्न साकार करण्यासाठी पिंप्री जलसेन गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला. जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष अँड उदय शेळके यांच्या पुढाकातुन गावकर्यांनी एकजुट करीत गावाला पाणीदार करण्याचा चंग बांधला .अन् गावाने आज राज्यात नावलौकीक मिळविला .आमच्या कष्टाचे आणि मेहनतीचे चीज झाले अशी प्रतिक्रिया या पाणीदार चळवळीच्या प्रणेत्या सौ. गितांजली शेळके यांनी यावेळी व्यक्त केली.
Post a Comment