साकळाई : 'या' कारणामुळे अभिनेत्रीचे उपोषण मागे ; मंत्र्यांनी केली फोनाफोनी
माय नगर वेब टीम
अहमदनगर – नगर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण आज मागे घेण्यात आले. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. पूरपरिस्थितीनंतर आपण साकळाईप्रश्नी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.
सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषद आवारात उपोषण सुरू केले होते. योजनेस मंजुरी मिळत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. १ सप्टेंबरपर्यंत जर निर्णय झाला नाही तर २ सप्टेंबरपासून पुन्हा याचठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे.
Post a Comment