या भाजप आमदाराने घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण



माय नगर वेब टीम
मुंबई - भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलं आहे. लाड यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

प्रसाद लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. चित्रा वाघ यांना भाजपमध्ये आणण्यात प्रसाद लाड यांची महत्वाची भूमिका राहिली होती.


राज ठाकरे हे गेल्या पाच वर्षांपासून भाजपवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करतायेत. त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post