महापुरात 43 जणांचा बळी


माय नगर वेब टीम

पुणे - पुणे विभागांमध्ये आत्तापर्यंत पुरामुळे ४३ जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये २१ बळी सांगली जिल्ह्यातील असून सात जणांचा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्ह्यातही प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली

म्हैसकर म्हणाले, की पुणे विभागामध्ये पडलेला पाऊस रेकॉर्डब्रेक आहे. यामध्ये अनेक प्रकारची हानी झाली आहे रविवारी दोन मृतदेह सांगली जिल्ह्यामध्ये सापडले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही तर तीन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती सांगली तर एक व्यक्ती कोल्हापूर आणि एक व्यक्ती सातारचे आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post