ज्यांनी किल्लारी उभं केले, त्यांच्याकडे सांगलीची जबाबदारी !
माय नगर वेब टीम
सांगली - सांगली- कोल्हापूरातला पूर ओसरल्यानंतर सरकारसमोर आव्हान असणार आहे ते तिथलं दैनंदिन जीवन पुर्ववत करण्याचं. त्याची जबाबदारी मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
1993 ला किल्लारीचा भूकंप झाला. त्यावेळी प्रविण परदेशी हे लातूरचे जिल्हाधिकारी होते. किल्लारीला पुन्हा उभं करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं.
पूरग्रस्त भागात लोकांना पुन्हा उभं करण्याची जबाबदारी घेत परदेशी सांगलीत दाखल झालेत. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी यासंबंधी आढावा बैठकही घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्र्याचे विश्वासू अधिकारी म्हणून आणि त्यासोबतच त्यांच्या कामासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत.
Post a Comment