आता अंत्ययात्राही थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत- जितेंद्र आव्हाड
माय नगर वेब टीम
मुंबई - पूरग्रस्तांना मदक करण्यासाठी सरकारला उशीर झाला. रागावू नका. स्टीकरच्या डिझाइन प्रिंटींगवा उशीर झाला म्हणून वाटायला उशीर झाला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.
आता अंत्ययात्रा थोड्या थांबून काढा कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत, असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यातच आव्हाडांनी आमदार प्रत्येक तिरडीला खांदा देणार, अशी टीपही त्यांनी दिली आहे.
पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह जाहीरातबाजी करण्यात आली आहे. स्टीकर छापण्यासाठी एवढा वेळ मिळतो कसा???, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, आता समजल की राज्य सरकारची मदत ही पाकीटांवर जाहीरात करण्यासाठी थांबली होती, असंही टीकाकारांकडून बोललं जात आहे.
Post a Comment