क्रांती दिनापासून यशवंत गाडे विद्यालयात प्लॅस्टीक हटाव मोहिम



क्रांतीदिनी उपक्रमाला सुरूवात : प्लॅस्टीक जमा करण्यासाठी विद्यार्थांना वाटल्या कापडी पिशव्या

माय नगर वेब टीम

अहमदनगर -: अविघटनशिल असणाऱ्या प्लॅस्टीकमुळे मानव निर्मित संकटांना तोंड द्यावे लागत असुन यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी फकिरवाडा येथील यशवंत गाडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांती दिनी प्लॅस्टीक हटाव मोहिम सुरू केली आहे.


स्वच्छ भारत अभियानातंर्गत क्रांती दिनाचेएवं औचित्य साधुन गाडे विद्यालयाने प्लॅस्टीक वापराविरोधात हे पाऊल उचलले आहे . यात टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनवणे या स्काऊट - गाईडच्या उपक्रमातुन कापडी पिशव्या तयार करण्यात आल्या. या पिशव्यांचे नगरसेवक योगिराज गाडे , नगरसेविका ज्योती गाडे , जिल्हा स्काऊट समन्वयक भोर , जिल्हा गाइड समन्वयक श्रीमती शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले .आठवडयातुन एकदा मुलांना या पिशव्या देऊन आठ दिवस त्यात घरातील व परिसरातील प्लॅस्टीक कचरा साठवण्यात येणार आहे .जमा झालेला कचरा मनपाच्या स्वच्छता विभागाला देऊन त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.




प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व प्लॅस्टीक निर्मुलन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे

स्वागत मुख्याध्यापिका हेमलता बनकर यांनी केले. प्रास्तावीक गाईड मास्टर संगिता लांडगे यांनी तर सुत्रसंचालन योगेश गुंड यांनी केले. मनिषा गोरे यांनी आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post