'त्या' माजी महापौरवर दाखल झालेला गुन्हा खोटा ; जगताप म्हणाले तातडीने चौकशी करा



माय नगर वेब टीम

अहमदनगर - माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व इतर यांचेवर जागेच्या वादावरुन खोटा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. फुलसौंदर यांची पार्श्वभुमी तपासल्यास सदरची व्यक्ती हि राजकीय व सामाजीक क्षेत्रात काम करते तसेच ऐतिहासिक अहमदनगर शहराचे प्रथम महापौर म्हणुन त्यांनी पद भुषवलेले आहे. त्यांचे समाजात चांगले स्थान आहे. त्यामुळे त्यांचेवर जो खोटा गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत योग्य ती चौकशी करावी व त्यांचेवर अन्याय होणार नाही, याचीही आपण सहानभुतीपुर्वक विचार करुन जिल्हा पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच यापुढे एखादया राजकीय, सामाजिक, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती यांची कारकिर्द संपविण्याच्या दृष्टिने असले प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचेवर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याबाबत योग्य ती चौकशी करावी. असे आ.जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व त्याच्या कुटुंबा विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र माजी महापौर फुलसौंदर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर समाज माध्यमात एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यातून त्यांनी खोटा गुन्हा दाखल झाल्याचे सागितले आहे.



माझे राजकीय करियर संपविण्याचा डाव
 माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा आहे. त्या फिर्यादीला व कुटूंबाला आम्ही ओळखत देखील नाही. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून माझे राजकीय करियर  व माझे कुटुंब उध्वस्त करण्याचा डाव असल्याचे स्पष्टीकरण  शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान
फुलसौंदर यांनी समाज माध्यमात दिले आहे.
 शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व त्याच्या कुटुंबा विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र माजी महापौर फुलसौंदर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर समाज माध्यमात एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यातून त्यांनी खोटा गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post