'या' कारणामुळे क्रीडा स्पर्धा रद्द ; पालकांनी दिला कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा



क्रीडा कार्यालय विरुद्ध पालक व विद्यार्थी संतप्त

माय नगर वेब टीम

अहमदनगर -

आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत तायक्वांदो व बेसबॉल स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी खेळाडू, पालक स्पर्धा स्थळी उपस्थित झाले. पण संघटनांसोबत राहण्याचा निर्धार सदरील दोन्ही संघटनांच्या पदाधिकारी वपंचांनी घेतल्याने या स्पर्धेस पंच पुरवण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आज असलेल्या दोन्ही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयावर आली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कुठलीही पूर्वसूचना नसल्याकारणाने खेळाडू संभ्रमावस्थेत होते. अनेक खेळाडू शाळेत तर थोड्याफार प्रमाणात खेळाडू स्पर्धा ठिकाणी पालकांसह हजर होते. स्पर्धा पुढे ढकलल्याचे कळताच पालकांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा निषेध व्यक्त करत गोंधळ घातला.

तालुका क्रीडा स्पर्धा अद्यापही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. 17 ऑगस्ट रोजी आंदोलन संपेल व 19 पासून क्रीडा स्पर्धा चालू होतील या उद्देशाने काही तालुक्यांनी नियोजन केली होती. पण 19 तारखे पर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने श्रीगोंदा व नेवासा तालुक्यातील स्पर्धा बेमुदत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही खेळांच्या विभागीय स्पर्धा जवळ आल्या असल्याने व तालुका स्पर्धांच्या नियोजनात कुठलेही शिक्षक अथवा संघटना तयार नसल्याने क्रीडा स्पर्धेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्या होणा-या जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा घेण्यास संघटनांनी नकार दिला आहे. या बाबत जिल्हा क्रीडा कार्यालय काय भूमिका घेते याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले असून पालकमंत्र्यांना भेटणार असल्याचे पालक वर्गातून सांगण्यात आले. या संदर्भात त्वरित निर्णय न झाल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास कुलुप ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post