...तर त्या ठिकाणी भाजपाच लढणार



माय नगर वेब टीम
अहमदनगर – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती निश्चित असली तरी जागा वाटप अंतिम झालेले नाही. त्यासाठी पुन्हा एकदा बैठक होईल. पक्षाचे नूतन कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा दि. 20 व 21 रोजी मुंबईत येत आहेत. ज्याठिकाणी युती होणार नाही. तेथील जागा मात्र भाजपच लढेल, असे भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रभारी, राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावाही त्यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी महाराष्ट्राच्या प्रभारी पांडे यांनी जिल्हा दौरे सुरू केले आहेत. त्याची सुरुवात त्यांनी रविवारपासून नगरमधून केली. पालकमंत्री राम शिंदे, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी, उपमहापौर मालन ढोणे, सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी आदी उपस्थित होते. आज (सोमवारी) त्या नाशिक येथे बैठक घेणार आहेत.
पूर्वी राज्यात भाजपला मिळालेल्या 122 जागा तर आम्ही जिंकूच, मात्र युतीमधील जागांवरही ताकद लावून त्या जिंकून आणू, युतीबाबत आता कोणतीही शंका नाही. शिवसेना वगळता इतर घटक पक्षांना दिल्या जाणार्‍या 18 जागा मात्र कमळ चिन्हावरच लढवाव्या लागतील, असेही पांडे यांनी अप्रत्यक्षरित्या सूचित केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post