ट्रक-कारच्या भीषण अपघातात ९ ठार


माय नगर वेब टीम
पुणे -
पुणे- सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रापंचायत कार्यालया समोर एर्टीगा गाडी व ट्रक यांची सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जागीच ठार झाले आहेत. मृत सर्वजण यवत (ता. दौंड) परिसरातील आहेत. हा आपघात (शनिवार) पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे. यातील सर्व जण महाविद्यालयाीण विद्यार्थी आहेत. या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इर्टीका कार ही यवतच्या दिशेने जात होती. लोनी काळभोर वाक वस्ती येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर कार गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने कारला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढणे अडचणीचे झाले होते. यामधील सर्व मृतदेह ही यवत परिसरातील रहिवासी आहेत. सर्वांना लोणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोरचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अपघातात मृत झालेल्यांची नावे:
शुभम रामदास भिसे (वय १९)
विशाल सुभाष यादव ( वय २०)
निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०)
अक्षय चंद्रकांत शिगे ( वय २०)
ऋषिकेश गणेश यादव ( वय २०)
अक्षय भरत वायकर ( वय २२)
नूरमोहम्मद आबास दाया ( वय २२)
परवेज अशपाक आतार ( वय २१)
जुबेर अजीज मुलाणी (वय २१)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post