वाळू तस्कराकडून 56 लाखांचा मुद्देमाल जप्त


संग्रहित


माय नगर वेब टीम
श्रीगोंदा - श्रीगोंदा व शिरूर तालुक्यांच्या हद्दीतून वाहणार्‍या घोड नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी होत असल्याने वाळू तस्करीला आळा बसण्यासाठी गुरुवारी रात्रीच्यावेळी कारवाई करून 6 ट्रक ताब्यात घेऊन सुमारे 56 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले.
बुधवार 10 जुलै रोजी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना अवैध वाळू उपसा व चोरी संदर्भात मिळालेल्या गोपनिय माहितीवरून त्यांनी पोलीस पथकासह घोड नदी पात्रा लगत दाणेवाडी शिवार याठिकाणी छापा टाकून चोरटी वाळू वाहतूक करणारे एकूण 6 ट्रक शिताफीने पकडले. पकडलेले ट्रक त्यातील वाळूसह पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले.

याबाबत बेलवंडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 198, 19 भा.द.वि. कलम 379, 34 सह कायदा क्रमांक 3, 15 असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्यामध्ये एकूण 56, लाख 36 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी कचरू विक्रम गायकवाड (रा. रामलिंग, शिरुर), ज्ञानदेव नामदेव विटकर (रा. बाबूरावनगर, शिरुर, गणेश सांगळे (रा. तर्डोबाचीवाडी), शिरूर, संतोष नंदू वाळके (रा. बाभुळसर, शिरूर, शाम धोंडिबा राठोड (रा. तर्डोबाचीवाडी, शिरुर), सतीश साबळे (रा. शिरुर) यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहा. फौजदार गवळी, पो. कॉ. देशमुख, ज्ञानेश्वर पठारे, नंदकुमार पठारे, श्रीरसागर गुंड, लोंढे यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post