राज्यातील रिक्षाचालकांनी उपसले संपाचे हत्यार ; मंगळवारी संप


माय नगर वेब टीम
मुंबई : राज्यातील ऑटोरिक्षा चालक- मालक येत्या मंगळवार (९ जुलै) पासून संपावर जाणार आहेत. बेकायदेशीर वाहतुक करणा-या ओला- उबेरसारख्या कंपन्यांवर तत्काळ बंदी आणावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्या संघटनेने पुढे केल्या आहेत. ऑटोरिक्षा चालक- मालक संघटना संयुक्ती कृती समितीने हा संप पुकारला आहे.


दरम्यान, संपूर्ण राज्यातील सुमारे २० लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे नागपूरसह राज्यातील शहरी भागात याचा मोठा प्रभाव जाणवणार आहे. खासकरून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना त्रास सहन करावा लागणार आहे. विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन विभागाकडे वेळोवेळी बैठका घेऊनही निर्णय न झाल्याने रिक्षाचालकांनी अखेर संपाचे हत्यार उपसले आहे.

ऑटोरिक्षा चालक- मालक संघटना संयुक्ती कृती समितीच्या मागण्या खालीलप्रमाणे…..

– ओला- उबेर यासारख्या कंपन्यांची सेवा तत्काळ बंद करावी.
– रिक्षाच्या भाढेवाढीबाबत हकीम समितीच्या शिफारसी तत्काळ लागू कराव्यात.
– राज्य सरकारकडे जे रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे या मंडळाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला जोडावे.
– अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यात भरारी पथके नेमावीत.
– पेन्शन, ग्रॅज्युईटी, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी.
– रिक्षा विम्यामध्ये मागील काळात भरमसाठ वाढ केली आहे ती तत्काळ कमी करावी. तसेच विम्याचे पैसे विमा कंपनीत न भरता परिवहन महामंडळत भरावेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post