' त्यांनी ' पाच वर्षापूर्वीचं यात्रा काढायला हवी होती




माय नगर टीम
बारामती - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी अशी यात्रा काढण्याऐवजी पाच वर्षापूर्वी सत्तेत आल्यावर यात्रा काढायला हवी होती, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.

पाच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर अशी यात्रा काढली असती तर जनतेची काय कामे करायची आहेत, याचा अंदाज त्यांना आला असता. किंवा मधल्या काळात अशी यात्रा काढली असती तर आपल्या सरकारच्या कामाचं मुल्यमापन करता आलेे असते, अमोल कोल्हे म्हणाले. मात्र जनआशीर्वाद सारख्या यात्रा काढणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचंही त्यांनी म्हटले.

शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे की काँग्रेस, राष्ट्रवादीने अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. मात्र भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्याचे आव्हान अजित पवार देऊनही त्यांनी कोणाचीही नावे जाहीर केली नाहीत, असे कोल्हे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post