अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रविवारी नगरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात बुथ कमिटीची आढावा बैठक घेण्यात आला. तसेच कामे न करणार्यांवर थेट कारवाईचा इशाराच देण्यात आला.
युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, निरीक्षक किशोर मासाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे आदी उपस्थित होते.
युवक प्रदेशाध्यक्ष शेख म्हणाले, बुथ कमिटीच्या जोरावर आगामी विधानसभा लढविण्यात येणार आहे. पराभवाने खचून न जाता जातीयवादी शक्तींचा पायबंद करण्यासाठी युवकांना ही निवडणूक हातात घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत यश, अपयश येत असते. विधानसभेत विजय मिळवण्यासाठी पक्षाच्या विचारधारेने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रीय होण्याचे त्यांनी आवाहन केले.
Post a Comment